नविन नांदेड। फेन्सिंग असोसिएशन नांदेड चा वतीने भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तरी वर्ष निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार व गोरव सोहळा जिजाऊ सृष्टी येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ सृष्टी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा मांताचा गौरव करण्यात आला.
गेल्या सात वर्षांपासून फेन्सिग असोसिएशन नांदेड चा वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी नगरसेविका सौ बेबीताई गुपीले प्रा.मनिषा पुरूषोत्तम धोंडगे, सुंगधा येवते, माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, भाजयुमो शहर महानगर अध्यक्ष संजय पाटील घोगरे, क्रिडाधिकारी पाठक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,सोपान पांडे,दिलीप कदम,सतिश बस्वदे, बालाजी शेळके,यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थिती होती.
कोरोना काळात लोहा कंधार तालुक्यातील शासकीय रुग्णालयात व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा काळात भाऊंचा डब्बा चा माध्यमातून प्रा.डॉ. भाई पुरुषोत्तम धोंडगे यांनी अविरत सेवेची ३०२ दिवस पुर्ण सेवा केल्याबद्दल सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र गौरव करण्यात आले तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू राहुल सिंह चंदेल, विशाल गंडीबे, संतोष कांबळे , तनविर राठोड, प्रतिक कल्याणकर, सार्थ पांडे, लक्ष्मीकांत हाटकर, राहुल ढगे,आशिष पवार, नंदिनी आळणे, श्रध्दा अवस्थी,तेजस जौधंळे, युवराज पवार, संघर्ष वाघमारे यांच्या सह जवळपास ३५ खेळाडू व प्रशिक्षक, कासीम खान,सुनिल दोसलवार,विक्रांत खेडकर,प्रा.रमेश नांदेडकर,राम पवार ,सुहास क्षिरसागर, मनोज पैंजणे, कुलदीपसिंह जट,त्यांच्या मातांचा फेटा व सत्कार गौरव करून सन्मान चिन्ह देऊन ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यास खेळाडू सह परिवारातील सदस्य, नागरिक ऊपसिथीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल वाघमारे,सुत्रसंचलन बालाजी गवाले तर आभार प्रदर्शन दिंगाबर शिंदे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.रमेश नांदेडकर, सचिन वाघमारे, निलेश डोगंरे, गयानोबा गिरडे, कासिम खान, यांनी परिश्रम घेतले, आभार जनार्दन गुपीले यांनी मानले.