हदगाव शहरातील नागरिक तालुक्यातील वाहन धारक रस्त्यावरील धुळीने ञस्त
हदगाव,शे चांदपाशा। शहरात सुमारे अनेक महीण्यापासुन रेंगाळलेले रुंदीकरणाचे काम व राष्ट्रीय महामार्ग गोजेगाव ते वारंगा या गावा पर्यत अर्धवट कामामुळे शहरात नागरिकात व राष्ट्रीय महामार्गाच्या रोडाच्या दुतर्फा गावात राहणाऱ्या गावक-याना धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन, तालुक्यातील नेते मंडळी आपल्या अलिशान कारचे काच चढवून या मार्गावरुन जात असल्याने त्यांना ह्या धुळीचा काहीच ञास होत नाही. पण या धुळीमुळे श्वसनाचे आजार होण्याचे धोका निर्माण झालेल आहे नागरिकांचा जीव टागणीला आहे.
हदगाव शहारात हदगाव - तामसा -भोकर -उमरी-कारेगाव व लोहगाव (पेव्हड शेल्डासह दुपदरिकरण हदगाव शहरातील क्राकोट रस्ता सीसीड्रेन) चे काम कासवगतीने सुरु आहे. या रोडचे काम बंद असल्याने व राष्ट्रीय महामार्गवरुन राञदिवस वाहने आवजड वाहनांची गर्दी असते. यामुळे दर अर्धातासात धुळीचे लोट दुकानाच्या मालावर साचतो आहे.
यामुळे नागरिक वाहनधारक व्यापारी कमालीचे वैतगाले असुन शहरात राज्य महामार्गाचे काम शहराच्या बाजुलाच राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम या दोन्ही कञाट नेमकं कोणती कपनी काम करते हे गुलदसत्यात असुन, या काम करणा-या क़पनीचे कामाच्या ठिकाणी बोर्ड हवे पण कुठे ही बोर्ड दिसुन येत नाही. वेळेवर काम होत नसल्याने बाधकामाचे सहीत्य पसरलेले असुन, अर्धवट कामामुळे मुरुम माती रस्त्याच्या कडेवर पसरलेले आहे. परिणामी वाहनाच्या ये-जा मुळे,सर्वत्र धुळ पसरत आहे.
आणखी विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग वर गेल्यास समोरून येणा-या टुव्हिलर फोरव्हिलर वाहनचालकांना धुळीमुळे समोरून येणारे वाहने दिसत नाहीत यामुळे अनेक अपघात ही झालेले आहे. या बाबतीत माञ नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करुन ही कुठे ही दाखल होत नसल्याने व जबाबदार नेते या बाबतीत 'मौण ' पाळले आहेत विशेष म्हणजे कञाटदाराकडुन सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे व्यवस्था माञ दिसुन येत नाही.