ग्रामीण भागात ठिकठिकाणी आरोग्य विभागाने राबविली यशस्वी मोहिम
हिमायतनगर। तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रा.आ. केंद्र सरसम व चिचोर्डी अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांना दयावयाचे डोसचे उदिष्ट्र 9166 हे हे होते. यातील 8229 बालकांना पोलिओचे डोस देऊन 90 टक्के उदिष्ट्र पुर्ण करण्यात आले.
यासाठी ग्रामीण भागात 107 बुथ तयार करण्यात आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. पोहरे, डॉ. अनिल पोपुलवार , डॉ. दामोधर राठोड , डॉ. वैभव नखाते, आशा समन्वयक श्री कृष्णा चौधरी, आरोग्य सहायक श्री नागमवाड, श्री सचिन देशमुख, श्री सौदागर अफरोज, श्री लंकलवाड, श्रीमती सोनाळे, श्रीमती राव, श्री लंकलवाड , श्री बिच्चेवार यांनी माहिती दिली. सदरील पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी , गट प्रवर्तक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले.