नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मातृ सेवा आरोग्य केंद्र २७ फेब्रुवारी रोजी २२ केंद्रावर ८० कर्मचाऱ्यांच्या साह्याने ८९९० बालकांना पल्स पोलिओ डोस पाजविणयात आले.
नांदेड शहर वाघाळा महानगर पालिकेच्या सिडको मातृसेवा आरोग्य केंद्र येथे मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने,आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश बिसेन, सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अब्दुल हमीद, यांच्या आदेशानुसार भरत मुंडे, सुरेश आरगुलवार, देविदास भुरेवार, गजभारे, व परिचारीका,आशा वर्कर यांनी २२ केंद्रावर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ते ५ या वेळेत जवळपास ८९८० बालकांना दिलेल्या उदिष्ट पुर्ण केले आहे.
सकाळपासूनच सिडको हडको परिसरातील अनेक केंद्रांवर बालकांना पल्स पोलिओ डोस पाजविणयासाठी महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.