नांदेड मध्ये हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजेल २८ फेब्रुवारी पासून -NNL

नांदेड केंद्रावर एकूण १५ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण 


नांदेड, अनिल मादसवार|
महाराष्ट्र शासन सानास्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्रातील विविध १९ केंद्रांवर दि.२१ फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. मा. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने संपन्न होणार्या या स्पर्धेचे राज्य स्तरीय ऑनलाईन उद्घाटन मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.

नांदेड केंद्राशी यावर्षी उपकेंद्र म्हणून लातूर जोडण्यात आल्याकारणाने पहिल्या टप्प्यात लातूर शहरात २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान लातूर येथील नाटकांचे सादारीकरण होणार आहे. दुसर्या टप्प्यात २८ फेब्रुवारी ते १४ जानेवारी या काळात नांदेड शहरातील कुसुम सभागृहात रोज सायंकाळी ७ वाजता नांदेड आणि परभणी असे मिळून एकूण १५ नाट्य प्रयोगांचे सादारीकरण होणार आहे. यात २८ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित “स्पेस, 

१ मार्च रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “उद्रेक”,२ मार्च रोजी छत्रपती सेवाभावी संस्था, उखळी, जी. परभणीच्या वतीने अभिजित वाईकर लिखित, सोनाली डोंगरे दिग्दर्शित “कधी उलट कधी सुलट”, 3 मार्च रोजी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने सुदाम केंद्रे लिखित, श्याम डुकरे दिग्दर्शित ”टकले रे टकले”,४ मार्च रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित,सौ. सुनिता करभाजन दिग्दर्शित “भयरात्र”.

५ मार्च रोजी नटराज कला विकास मंडळ जिंतूर, जी. परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “धर्मदंड”, ६ मार्च रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “ड्रीम्स रिले”, ७ मार्च रोजी संत सर्वज्ञ दासो दिगंबर सेवाभावी प्रतिष्ठान बीड, नांदेड शाखेच्या वतीने डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित, राजीव किवळेकर दिग्दर्शित “दास्ताँ”, ८ मार्च रोजी सरस्वती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, सौ. स्वाती देशपांडे दिग्दर्शित “कळा या लागल्या जीवा”,९ मार्च रोजी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने गिरीश जोशी लिखित, प्रमोद देशमुख दिग्दर्शित “फायनल ड्राफ्ट”. 

१० मार्च रोजी शुभंकरोती फौंडेशन नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, किरण चौधरी दिग्दर्शित “एक परी” ११ मार्च रोजी ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित “जय भीम निळा सलाम” १२ मार्च रोज शाक्य सर्वांगीण विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने, नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित “यशोधरा”, १३ मार्च रोजी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “२८ युगांपासून मी एकटी” आणि १४ मार्च रोजी झपूर्झा फौंडेशन परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित, दिग्दर्शित “अस्वस्थ वल्ली” या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.  

कोरोनाच्या काळामुळे गत वर्षी स्पर्धेचे आयोजन झाले नाही. याही वर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता नाट्य स्पर्धा कोरोना विषयक सर्व नियम पाळून संपन्न होणार आहे. नांदेड शहरातील रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी सभागृहात गर्दी केली आहे. या हि वर्षी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी