सुजलेंगाव येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती जल्लोषात साजरी -NNL


नायगांव, दिगंबर मुदखेडे|
नायगांव तालुक्यातील सुजलेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवप्रतिष्ठान अध्यक्ष बालाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य पटांगणामध्ये सुजलेगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिगंबर जाधव, बाळासाहेब मुदखेडे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.

यावेळी दिगंबर जाधव यांनी शिवाजी महाराजांचे चरित्रावर मार्गदर्शन केले. त्यांनी समाजाला एक चांगला संदेश देत युवकांनी व्यसनाधीन न जाता निरर्व्यसनी राहण्याचा संकल्प मनामध्ये घ्यावा. सर्व धर्म समभाव मनामधील मतभेद बाजुला ठेवून एकत्रित याव, जसं एक वाघ हजारों मावळ्यांना एकत्रित घेउन स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राला जागी ठेवण्याचं काम केले होते त्याच पद्धतीने विचार करून त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवावेत. प्रतेक घरामधे एक तरी मावळा आदर्श म्हणून कार्य करण्यास इच्छुक असायला पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रातील कृतीशील योगदान देत आपल्या सर्वांना एकत्र ठेवणारा असा मोठा राजा आपल्या महाराष्ट्र माता जिजाऊ यांच्या पोटी एक हिरा जन्मला आहे.

राजाधिराज महाराज... शिवराय राजा... शिवछत्रपती... कर्तव्यदक्ष...सिंहासनाधीश.... छत्रपती शिवराय... दुर्गपती.... गजअश्वपती.... भूपती...प्रजापती... सुवर्णरतन श्रीपती... अष्टावधान जागृत... अष्टप्रधान वेष्ष्टित... न्यायालंकार मंडित... शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत... राजनीति धुरंधर... प्रौढप्रताप पुरंदर... गोब्राह्मणप्रतिपालक... मुघलसंहारक... म्लेंछक्षयदिक्षीत... सिंहासनाधिश्वर... राजाधिराज महाराज... श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज...अशा आणि कित्येक बिरुदांनी जसे की मोघलांचा कर्दनकाळ... शेतकर्‍यांचा तारणहार... स्वतःच्या सरदारांना देखील मित्रासारखी वागणूक देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... वंशपरंपरेने पिड्यानपिड्या राजेपद मिळणे ही वेगळी बाब आहे. परंतु शुन्यातून विश्व निर्माण करुन स्वराज्य निर्माण करणारे महापुरुष कालखंडानंतर एखादे होतात त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज एक होय. ज्यांचा जन्म शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. 

निती न्याय, धर्म, संस्कार, सदाचार या मजबुत खांबावर जे राज्य उभे असते. ते राज्य म्हणजे रयतेचे राज्य आणि उपरोक्त सदगुणांचा दैनंदिन कारभारात वापर करणारा राजा हा रयतेचा राजा असतो. जेंव्हा जेंव्हा धर्म संकटात असतो. तेंव्हा तेंव्हा धर्माच्या रक्षणासाठी महापुरुषांचा जन्म होतो हा इतिहास आहे. रामायण, महाभारत ते आधुनिक कालखंडापर्यंत वंशपरंपरेने राजा होणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु भटक्या, फाटक्या, वंचित, पिडीत, अन्याय आणि अत्याचाराने जर्जर झालेल्या राज्यातील रयतेला त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत करुन राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि छत्रपती शिवाजी महाराज खरे रयतेचे राजे झाले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्षमय इतिहास जगभरातील लोकांसाठी ऊर्जास्त्रोत आहे आणि संबंध जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरवशाली इतिहास आज वेगवेगळ्या स्थानिक भाषेमध्ये अभ्यासला जातो. महाराजांच्या अंगी प्रचंड ध्येयशक्ती आणि संयमालाही संकोच वाटेल इतकी सहनशक्ती महाराजांकडे होती. महाराजांच्या जिवनातील अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये ध्येयशक्ती आणि संयम याचे दर्शन घडते. त्यापैकी अफजलखानाचा वध, शाहीस्तेखानाची केलेली फजिती, सिद्धी जौहरच्या वेढ्यातून सहीसलामत बाहेर पडण्याची योजना, आग्रास्थित औरंगजेब बादशहाच्या तावडीतून सहीसलामत स्वतःकडील एकाही व्यक्तीच्या केसाला धक्का न लागता परत येण्याची किमया. वरील सर्व प्रसंग हे प्रचंड ध्येयशक्ती आणि संयमाचे ज्वलंत उदाहरण आहेत.

 अशा कल्याणकारी रयतेच्या राजास गावकऱ्यांच्या वतीने मानाचा मुजरा. करुन संकल्प हाती घ्यावे असे मार्गद्शन केले. त्या निमित्ताने गावातील प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी भगवंतराव देशमुख उपसरपंच लक्ष्मणराव पाटील, निळकंठ पाटील सुजलेगाव नगरीचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य सदस्या सौ. दैवशाला नगोराव डुमणे, चेरमन गांगधर पाटिल कुऱ्हाडे, शिवशेना शाखा प्रमूख मधूकर पा,शिंदे,बालाजी वेंकटराव देशमुख माजी उपसरपंच तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर, माजी उपसरपंच जे.पी. ईबितदार, मारोती कदम,माधवराव कुऱ्हाडे ,माझी सदस्य दिपक जाधव, गजानंद शिंदे, प्रविण मोरे, देवराव आईलवार ,नागोराव डुमणे, संजय सूर्येकार, उपस्थित आजी माझी पदाधिकारी व गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी