शिवजन्मोत्सव निमित्ताने सिडको परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुतळ्यास अभिवादन-NNL

नविन नांदेड। शिवजयंती निमित्ताने  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोगनिदान व उपचार शिबिर, व  सिडको हडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, महाराणा प्रतापसिहं यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर विविध परिसरातील भागात अन्नदान वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको हडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुशोभीकरण व विघुत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. तर जिजाऊ सृष्टी सिडको येथेही सुशोभीकरण करण्यात आले होते परिसरातील मुख्य रस्त्यावरील अनेक भागात जन्मोत्सव निमित्ताने शुभेच्छा फलक लावण्यात आले होते, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सिडको व हडको व जिजाऊ सृष्टी व अण्णाभाऊ साठे,महाराणा प्रतापसिहं यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, नगरसेविका सौ.बेबीताई गुपीले, युवानेते उदयभाऊ देशमुख, माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे, माजी नगरसेवक अशोक मोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उध्दव पाटील शिंदे,भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख,वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठल गायकवाड, सुदर्शन कांचनगिरे, व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी दिलीप कदम ,संग्राम मोरे, साहेबराव गाढे, राजु लांडगे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना संयोजक तथा नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांचा वतीने सिडको वृत्तपत्र विक्रेते यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून परिक्षा प्याड व मिठाई चे वाटप  सिडको वृत्तपत्र विक्रेते टिनशेड येथे सकाळी सात वाजता युवा नेते उदयभाऊ देशमुख व मान्यवरांच्या  उपस्थितीत करण्यात आले,तर संभाजी चौक सिडको येथे सामाजिक कार्यकर्ते प्रेसनजित वाघमारे यांच्या वतीने शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे लिखीत एक हजार पुस्तके वाटप करण्यात आली.

सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवभक्त व नागरीकांना संयोजक तथा युवा नेते उदयभाऊ देशमुख यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. तर शिव महासंग्राम संघटना जिल्हा नांदेड यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने ओकांर मित्र मंडळ यांच्या वतीने हडको येथील भागात शिवजन्मोत्सव शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत तर जिजामाता वसाहत चा वतीने  महाराणा प्रतापसिंह महाराज पुतळा येथे खिचडीचे वाटप करण्यात आले. 

यावेळी  नांदेड तालुका दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, संभाजी जाधव यांच्या सह वसाहती मधील नागरीक ऊपसिथीत होते, सिडको परिसरातील अनेक भागात व्यापारी मित्र मंडळ, विविध व प्रतिषठाणाचा वतीने अन्नदान,पाणीपोई व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ पासूनच सिडको व हडको परिसरातील व जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊंना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी परिसरातील अनेक शिवभक्तांनी दुचाकी व सायकलीवरून भगवे ध्वज लावून अभिवादन केले.

परिसरातील हडको येथुन पारंपारिक वाघवृंद असलेल्या बँड पथकाचा समावेश असलेल्या भव्य मिरवणूक दुपारी दोन वाजता हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून  काढण्यात येणार आहे.  या मिरवणुकीत लोकप्रतिनिधी सह पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.या मिरवणूक मध्ये महिलांच्या मोठ्या प्रमाणात समावेश राहणार असल्याचे समितीच्या वतीने संयोजक मिरवणूक समितीने सांगितले. परिसरातील विविध भागात शिवजन्मोत्सव निमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी