नविन नांदेड। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक वाघंवृदं व जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली या वेळी महिला युवक, नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हडको येथुन १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजता आ.मोहनराव हंबर्डे, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजपा महिला नगरसेविका सौ बेबीताई गुपीले,भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, माजी नगरसेवक अशोक मोरे,युवा नेते उदयभाऊ देशमुख, भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख,युवा गुप्रचे सतिश बस्वदे, वंचित बहुजन आघाडी चे दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सिडको जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योती पाटील, हणमंत कदम,अमोल जाधव,शाहीर गौतम पवार, शंकरराव धिरडीकर, प्रा.मधुकर गायकवाड, प्रा. राहुल वाघमारे, व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी दिलीप कदम, बापुसाहेब पाटील,संग्राम मोरे , तिरूपती पाटील घोगरे,विश्वास हंबर्डे, जयंवत काळे, साहेबराव गाढे,त्रयंबक कदम ,भगवानराव ताटे,दिंगाबर शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
हडको येथुन हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून काढण्यात आलेल्या मिरवणूक मध्ये महिलांच्या, युवक मोठ्या प्रमाणात समावेश होता. भगवे ध्वज, पारंपरिक वाघंवृदं,ढोल ताशा, जयभवानी जय शिवाजी घोषणा मध्ये हि मिरवणूक निघाली, मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी उत्साहात व जल्लोष मध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठान, राजकीय सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी स्वागत केले, परिसरातील विविध भागात शिवजन्मोत्सव निमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,संकेत दिघे, उपनिरीक्षक महेश कोरे,बि.टी.केद्रे,माणिक हंबर्डे, गणेश होळकर, यांच्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.