उस्माननगर, माणिक भिसे। परिसरातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी ,भाविक भक्तांनी महादेव मंदिरात देवाला जाताना शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत उद्या महाशिवरात्र सण उत्साहात साजरा करा असे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानोबा देवकते, पोलिस उपनिरीक्षक श्री.बाबासाहेब थोरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना भाविकांना आवाहन केले.
भारतात मागील दोन-तीन वर्षापासून कोरोना या महामारीच्या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जीवन विस्कळीत झाले होते. आनेकांना प्राण गमवावे लागले.सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आसले तरी भीती मात्र कायम आहे.उस्माननगर पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या मंदीराना भेटी देऊन पहानी केली.
महादेव मंदीरातील प्रमुख यांनी व स्वंयसेवकांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच महादेव मंदीरात जाताना परिसरातील नागरिकांनी उद्या महाशिवरात्र सण साजरा करताना खबरदारी म्हणून मास्क लावून दर्शनाच्या रांगेत उभे राहावे.व आपली व इतरांची काळजी घ्यावी आसे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.