हुजपा महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती श्रमदानाने साजरी" -NNL


हिमायतनगर|
येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज कर्मयोगी स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांची जयंती श्रमदान करून साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे  तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. डी. के. कदम, डॉ सूर्यप्रकाश जाधव, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सविता बोंडारे तसेच कार्यालयीन अधिक्षक श्री संदीप हरसूलकर आदी उपस्थित होते. 


सुरुवातीला मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकतांना संत गाडगेबाबा यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशी होती. व त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना साध्या व सोप्या पद्धतीने स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून दिले. या विषयीची थोडक्यात माहिती त्यांनी करून दिली. शेवटी अध्यक्षीय समारोपा नंतर उपस्थित सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. 

तसेच कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीने महाविद्यालयाचा परिसर व रस्त्यातील खड्डे भरून केर कचरा झाडून स्वच्छ केला. व श्रमदानानंतर महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच श्रमदान केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. 

याप्रसंगी महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉप व कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम हा कोविड-19 विषयी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्यात आला

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी