उस्माननगर, माणिक भिसे। नमस्कार चौक नांदेड जवळील धनराज पॅलेस येथे नुकतेच महाराष्ट्र आयकॉन २०२२ स्पर्धेत बेस्ट वाॅक मध्ये उस्माननगर येथील नवयुवक महमंद दिलशाद शेख मगदूम या तरूणाने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविण्यात यश मिळाले आहे.
"बेस्ट वाॅक " महाराष्ट्र आयकॉन २०२२ ही स्पर्धा ममता राजपूत, सुमेश राजपूत,फैसल सिद्दीकी, यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.या झालेल्या स्पर्धेत अकरा माॅडलिंग मुलांनी सहभाग घेतला होता.दिलशान शेख यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण करून दुसरा क्रमांक मिळविल्या बद्दल त्यांच्या आजीने,आई,मामा,मामी यांच्या सह मित्रांनी अभिनंदन केले आहे.उस्माननगरच्या दिलशाद शेखचे" बेस्ट वाॅक" माॅडेल स्पर्धेत यश-NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क
0