हदगाव, शे चांदपाशा। शासनाने सातबारा उतारे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत हदगाव शिवसेना तालुका प्रमुख व कृ उ बा. समितिचे सभापती शामराव चव्हाण यांनी व्यक्त केले. शेतजमीनीचे मालकी हक्क एकुण क्षेत्र फेरफार व इतर सर्व महत्त्वाचे नोदीची माहीती असलेला सातबारा हा शासकीय दस्तऐवज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रात काही शहरामध्ये सर्वेक्षण पुर्ण झालेलं आहे तरी सातबाराची उतारे चालु आहे सातबारा अश्या ठिकाणी सातबारा देणे बंद होणार आहे. त्या ऐवजी फक्त प्रापर्टी कार्ड देण्याचा शासनाने घेतला आहे. सातबारा ऐवजी आता प्रापर्टी कार्ड मध्ये झाल्याने विशेष म्हणजे इन्कम टँक्स चुकविण्याकरिता आशा सातबाराचा वापर केला जात होता हे टाळण्यासाठी राज्यशासनाच्या भुमी अभिलेख विभागाने हा जबरदस्त निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार याचीअमलबाजावणी प्रयोगिक तत्त्वावर राज्याच्या प्रमुख शहरात करण्यात येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर सपुर्ण महाराष्ट्रात अमलात येईल यामुळे बेकायदा अवैध खरेदी विक्रीला आळा बसेल. तसेच जमिनीवरील अवैध आतिक्रमणे सहज काढता येईल विशेष म्हणजे प्रापर्टी कार्ड मिळताच मालमत्ताचे सविस्तर माहीती मालकी हक्काची नोद नकाशा इत्यादी तपशिल असल्याने गैरप्रकारला आळा बसु शकेल.