सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा पुढाकार
नवीन नांदेड। भारताचे माजी गृहमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मराठवाड्याचे भगीरथ, मराठवाड्याचे वैभव, गोदाकाठचे महान कर्मयोगी, २४ धरणाचे निर्माते, जननायक जलनायक, हरित क्रांती चे प्रणेते. जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय,स्वर्गीय कै. डॉ. शंकरराव चव्हाण साहेब व वात्सल्यसिंधू, कै.सौ.कुसुमताई चव्हाण
यांचा पुण्यस्मरण दिन आज दिनांक २६.फेब्रुवारी २२ वा.सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या च्या वतीने साजरा करण्यात आली ,अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका तथा सिडको वाघाळा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे या होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय कै.डॉ.शंकरराव चव्हान कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ब्लॉक कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे म्हणाले की कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईने गोर गरीब लोकांसाठी अनेक शासकीय योजना आल्या.
सिडकोची निर्मिती करुण हजारों गरीब कुटुंबांना निवारा देण्याचे काम केले. अशा महान कर्तुत्ववान लोक नेत्याचे कार्य सदैव अजरामर राहिलं आशी भावना व्यक्त केली. यावेळी भि. ना.गायकवाड, यांनी व्यक्त करतांना म्हणालेकी देशाच्या राजकारणात विविध पदे भूषवून अनेक लोककल्याणकारी कामे करणारे नेते म्हणजे कै. डॉ.शंकरराव चव्हाण होत तर डॉ. अशोक कलंत्री, म्हणाले की केंद्रात व राज्यात प्रशासनात कडक शिस्त ठेवून प्रशासनाला गतिमान करण्याचे उत्कृष्ट काम केले. असा नेता पुढे होणे शक्य नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. ललिता शिंदे म्हणाल्या की कै.डॉ.शंकरराव चव्हाण व वात्सल्यसिंधू कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं अशा महान नेतृत्वाची महती व कामगिरी ही संपूर्ण भारतभर एक शिस्तप्रिय नेता म्हणून ओळखली जाते अशा थोर नेत्याचे कार्य व विचार सदैव प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत असे प्रतिपादन केले.
यावेळी राजू लांडगे,विश्वनाथ शिंदे, शेख लतिफ,काशिनाथ गरड, एस.पी.कुंभारे,प्रा.अशोक मोरे, संजय कदम,के. एल. ढाकणीकर, संतोष कांचनगिरे, नूरुद्दीन मामू, नारायण कोलंबीकर, प्रभू उरुडरुड, वैजनाथ माने, सुनील शिंदे, प्रा.गजानन मोरे,भुजंग स्वामी,माणिकराव श्रोत्ते, पंढरीनाथ मोटरगे,किशनराव रावणगावकर,रामराव जावरे, देवीदास कदम,नामदेव पद्मने, भगवान जोगदंड,गणेश खंदारे,प्रल्हाद जोगदंड, प्रकाश वानखेडे,संगम कांचनगिरे, दत्ता गांगातिरे, श्रीमती सुभद्रा कदम, सौ.ज्योति संदिप कदम.सौ. कविता चव्हाण,सौ.विमलाबाई चित्ते, सौ ललिता कामठेकर,सौ. भारतबाई रणवीर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.रमेश नांदेडकर यांनी मानले.