नागरी सुविधा केन्द्र बांधकामात सरपंच-ग्रामसेवक यांनी केला गैरव्यवहार ग्रामसेवक जे.आर.लाकडे निलंबित, सरपंचावर अपात्रताची कारवाई करा
अर्धापूर/नांदेड। तालूक्यातील लहान येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून नागरी सुविधा केन्द्र (सी.एस.सी.केन्द्राच्या) बांधकामात 3 लाख रूपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाल्याने ग्रामसेवक जे.आर.लाकडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सदरची कारवाई सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.(आय.ए.एस)यांनी केली आहे.
ग्रामपंचायत लहान येथे नागरी सुविधा केन्द्र बांधकामासाठी चार लाख रूपये निधी मंजूर झाला सदर बांधकाम न करता ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून बांधकाम न करता 3 लाख रूपये आठ महिन्यापुर्वी बॅंक खात्यातील उचलून घेऊन गैरव्यवहार केलेला आहे. याप्रकरणी सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती अर्धापूर कार्तिकेयन एस. (आय.ए.एस.)यांनी सखोल चौकशी करून नागरी सुविधा केन्द बांधकाम केले नाही व सदर रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने ग्रामसेवक लाकडे जे.आर.यांना निलंबित करण्यात आले आहे.
आर.जी.एस.ए.अंतर्गत नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी लहान येथे नागरी सुविधा केन्दासाठी चार लाख रूपयाचा निधी २०२१ साली मंजूर करण्यात आला होता . सदर सुविधा केन्द बांधकाम न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी एसबीआय बॅंक शाखा अर्धापूर खाते क्रमांक 62275989338 या खात्यातून सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त स्नेही संतोष आडे यांच्या नावे चेक क्रमांक 299033 या चेक द्वारे 3 लक्ष रूपयाचा चेक देऊन अपहार केला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व नियम 1964 (3)(1)नुसार सदर अधिकारी व पदाधिकारी यांची कामात वर्तणूक व सचोटी दिसून येत नाही व कार्यालयीन कामात विश्वसनीय नाही.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 60 (अ)नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 भाग परिशिष्ट 2 नियम 11 (11)चे अवलोकन करता कर्तव्यात कसूर केला आहे. बांधकाम पुर्ण न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे. यावरून ग्रामसेवक जे.आर.लाकडे यांचे दिनांक २४ रोजी निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात लाकडे यांच मुख्यालय पंचायत समिती अर्धापूर येथे राहणार आहे. तसेच त्यांना इतर खाजगी व्यवसाय करता येणार नाहीत.जर तसे आढळून आले तर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहातील असे निलंबन आदेशात आय.ए.एस.कार्तिकेयन एस.यांनी नमूद केले आहे.यामुळे गैरव्यवहार करणाराचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पत्रकार सुभाष लोणे यांनी गैरव्यवहार करणारे
सरपंचावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे -सुभाष लोणे
जणतेला सुविधा मिळाव्यात म्हणून तालुक्यातून फक्त लहान या गावी नागरी सुविधा केन्द्र व यासाठी 4 लक्ष रूपये मंजूर झाले. बांधकाम न करता आठ महिण्यापुर्वी 31 जूलै 2021 रोजी 3 लाख रूपये सरपंच-ग्रामसेवक यांनी संगनमतानेच दुसर्या व्यक्तीच्या नावे उचलून गैरव्यवहार केला दोघेही बरोबरीचे भागीदार आहेत.ग्रामसेवक निलंबित करण्यात आले आहे. गैरव्यवहारात बरोबरीचा भागीदार असणारा सरपंच यांच्यावर देखील अपात्रतेची कारवाई झालीच पाहिजे. कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.भ्रष्टाचार करणार्या सरपंचास अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.लवकरच कारवाई होईल.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती पत्रकार सुभाष लोणे यांनी दिली आहे.