हवामान व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांची कोणतीही पिंके नापीक होणार नाहीत-NNL

हवामान तज्ञ,पंजाबराव डख यांचे प्रतिपादन..

नविन नांदेड। शेतकऱ्यांना अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागत असे पंरतु हवामान व पावसाच्या अंदाजावर कोणत्याही परिस्थितीत पिंके नाहीसी होणार नाहीत यासाठी मार्गदर्शन व अंदाजावर सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा हवामान विषयक तज्ञ पंजाबराव डख यांनी विष्णुपुरी येथे आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यक्रमांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता विष्णुपुरी येथे पंजाबराव डख  यांच्ये शेतकऱ्यांना व लहुजी पांडे  यांचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, मराठा समुहाचे नांदेड अध्यक्ष संतोष शिंदे, ग्रामपंचायत संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे, ऊपसंरपच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, काळेशवर विष्णुपुरी देवस्थान समितीचे सचिव  शंकरराव हंबर्डे, शिवसेना शाखा प्रमुख अशोक हंबर्डे, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग हंबर्डे,माजी सैनिक प्रभाकर हंबर्डे, यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती, यावेळी ऊपसिथीत पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन केले.

यावेळी पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना पावसाच्या अंदाजावर कोणत्याही परिस्थितीत पिकांची काळजी घ्यावी या बाबत व हवामानाचा अंदाज वर कोणती पिके कशी  घ्यावीत या बाबत मार्गदर्शन केले, कावळ्याच्या व चिमण्यांचा घरटयावरून ही पावसाचा व पिके घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याचे सांगितले तर शेतकऱ्यांना कोणत्या त्रुतू मध्ये कोणकोणत्या पिके घ्यावीत या बाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांची कोणतीही पिके नाहीशी होणार नाहीत या बाबत घ्यावयाची काळजी व २८ फेब्रुवारी आत शेतकऱ्यांनी हरभरा पिके काढुन घ्यावीत कारण पावसाची शक्यता असल्याचे सांगितले.वेगवेगळया अंदाजावर डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जोबीते गुप्र समुहाचे लहु पांडे यांनी आय.टी. क्षेत्रातील युवकांना मार्गदर्शन केले तर करियर घडविण्यासाठी त्यांनी सखोल अभ्यासक माहिती दिली. ऊपसिथीत पाहुण्यांचे स्वागत व सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. शिवजन्मोत्सव निमित्ताने पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित केल्याने अनेकांनी जयंती मंडळ पदाधिकारी यांच्ये अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी