तेलंगवाडी येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद , वसंत मेटकर यांचा सत्कार-NNL

उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर बिट अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद.प्रा.शाळा तेलंगवाडी येथे  २२ रोजी सोमवारी बीटस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांना भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने दिला जाणारा" महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड २०२१" हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

ज्यामध्ये निष्ठा 3.0, वाचन विकास कार्यक्रम, गोष्टीचा शनिवार, स्वाध्याय, आजादी का अमृतमहोत्सव, शिकू आनंदे ,शिक्षण आपल्या दारी इत्यादी विषय अंतर्भूत होते. शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली शिक्षण परिषदेस कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय येरमे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राजेश्वर पांडे , श्री.वसंत मेटकर, तेलंगवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, शा.व्य.समिती अध्यक्ष ,केंद्रप्रमुख श्री.जयवंतराव काळे , श्री.ढोणे सर,श्री.कनशेट्टे सर व गटसाधन केंद्र कंधारचे साधनव्यक्ती, विषयतज्ञ उपस्थित होते. 

शिक्षण परिषदेची सांगता शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंत मेटकर यांनी सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे व त्यांना 'भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने "महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप नॅशनल अवार्ड-२०२१ मिळाल्याबद्दल त्यांचा संपूर्ण बिटच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शा. तेलंगवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.कुलकर्णी ,सहशिक्षक श्री.साधू , श्री.शिंदे, व सौ.नरंगले  यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी