राहेगाव येथे शिवजयंतीचे औचित्य साधून सेनिटायझर फवारणी-NNL

नविन नांदेड। राहेगाव येथे शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपुर्ण गावात सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे यांनी सेनिटायझर फवारणी केली व राहेगाव‌ ते नांदेड  शिवतीर्थ पायी दिप ज्योती नेण्यात आली. यात गावांसह अन्य गावातील युवकांनी सहभाग नोंदविला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ वी शिवजयंती निमित्ताने कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील अंतर्गत व मुख्य मार्गवर सेनिटायझर फवारणी  सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे यांनी केली,व शिवजयंती दिवशी संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली. त्यानंतर नियोजित पुतळा स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आरती करून मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राहेगाव  येथुन शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यत पायी चालत आणलेल्या दिप ज्योतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी साहेबराव इंगळे,किशन भोगं,प्रभु भोगं, नारायण इंगळे, तंटामुक्त अध्यक्ष आनंद भोग, संभाजी भोंग, तुकाराम इंगळे, ज्ञानेशवर भोग यांच्या सह जेष्ठ नागरिक ,युवक , ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राहेगाव येथुन निघालेल्या पायी  दिप ज्योती मध्ये  राहेगाव  किकी,व भायेगाव येथील शिवभक्त व युवकांचा सहभाग होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी