सदर मोहिमेचे उद्घाटन मनपा दवाखाना जंगमवाडी येथे मा. महापौर सौ.जयश्री निलेश पावडे, मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने,मा.उपमहापौर अ.गफ्फार अ.सत्तार , स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, महिला शिक्षण व बाल कल्याण समितीच्या सभापती संगीता विठ्ठल पाटील डक, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) गिरीश कदम, उपायुक्त (आरोग्य) डॉ. पंजाबराव खानसोळे,माजी नगरसेवक किशोर भवरे यांच्या उपस्थितीत बाळाला लस पाजवुन सदर मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, डॉ.सुप्रिया पंडीत, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी सी टी ओ डॉ बदीओद्दीन हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी हेमराज वाघमारे,विनु मोरे, मिलींद ढोले,शे.रफीक मयुर पारीख, वैभव नरवाडे,सुरज तसांमड यांनी परिश्रम घेतले.