लोहा| फिटस येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही बाब चिंताजनक असली तरी त्यावर उपाय आहेत. या रोगा बाबत दैनंदिन जीवनात असणारे गैरसमज दूर होण्याची गरज असून, रुग्णांनी याचा बाऊ करू नये असे प्रसिद्ध न्यूरॉलौजिस्ट डॉ प्रमोद धोंडे यांनी केले.
शिवाश रिहॅब सेंटर फिटस दिनाचे औचित्य साधून फिटस रुग्णासाठी प्रसिद्ध न्यूरो तज्ज्ञ डॉ प्रमोद धोंडे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. डॉ. मयुरा धोंडे, अश्विनी धोंडे, अमोल धोंडे यांची उपस्थिती होती. शिवाश रिहॅब सेंटर मध्ये पक्षाघात झालेल्या रुग्णावर वैद्यकीय पद्धतीने अतिशय यशस्वीपणे उपचार केले जातात. डॉक्टर प्रमोद धोडे यांनी फिटस रुग्णांना समुपदेशन केले. काही मुलीनी विवाहात येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.
मनमोकळ्यापणाने अडीअडचणी मांडल्या. डॉ धोंडे यांनी या आजाराहु मधुमेह व रक्तदाब हे मोठे आजार आहेत. पण आपण उगीच फिटस या आजाराचा बाऊ करतो. त्या बाबत काही पथ्य पाळायला हवीत. लग्न करतानाच अशा रुग्णांनी आपला आजार लपवू नये म्हणजे त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार नाहीत.
यासह रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले .रुग्ण व नातेवाईक यांनी शंका विचारल्या त्याचे निरासरण डॉक्टरांनी केले. समुपदेशनासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ प्रमोद धोंडे यांच्या या समुपदेशना मुळे रुग्ण व नातेवाईक यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली. असे शिबिर नेहमीच घेऊन या आजाराबद्दल जनजागृती करावी म्हणजे फिटस बाबतीत लोकांचे गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा उपस्थिती रुग्ण व नातेवाईक यांनी व्यक्त केली.