नांदेड| कतीच राज्याच्या विधिमंडळाची अर्थसंकल्पीय अधिवेशना संदर्भात बैठक झाल्याचे व पुढील महिन्याच्या 11 तारखेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडलात मांडला जाणार असल्याचे विधिमंडळ कामकाज सल्लागार तथा राज्याचे परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी जाहिर केले.
महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन दि.मार्च 3-25 या कालावधित घेण्याचे कामकाज सल्लागार समितीत ठरले असल्याचे आणि विशेष करून आता प्रलंबित असलेली व येणारी बिलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जातील. तसेच अर्थसंकल्पावरील ज्या मागण्या असतील त्यासाठी पांच दिवसांची चर्च्या देखील होऊन त्या मान्य केल्या जातील असे त्या बैठकीत ठरल्याचे मंत्री महोदयांनी सांगीतले. या बैठकीत विधिमंडळ बैठकितील जवळपास सर्वच(शासनातील व विरोधी सदस्य) सदस्य उपस्थित होते असेही ते म्हणाले.
त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ आठरा टक्के एवढ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अति प्रलंबित तथा अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा हे माय-बाप सरकार नक्किच सहानुभूतीपूर्वक विचार करेल व सोडवेल असी अपेक्षा महाराष्ट्रातील सकल ज्येष्ठ नागरिक व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम)मुंबई करत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे अति प्रलंबित प्रश्न जसे देशातील इतर व शेजारील राज्याप्रमाने ज्येष्ठ नागरिक धोरन अंमलात आणावे.
ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा साठ वर्षच ग्राह्य धरावी,व वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित शेतकरी,कष्टकरी, शेत मजुर,कामगार तथा गरजू ज्येष्ठ नागरिकांना फेस्काॅम संघटणेच्या मागणी प्रमाणे प्रतिमहा 3500/-रू.मानधन आणि राष्ट्र हितासाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या क्रय शक्तीचा सदुपयोग करून घेण्यास तत्वतः मान्यता ध्यावी. संविधानातील क.41 प्रमाणे ज्येष्ठांच्या वयाचा,राष्ट्रउभारणी प्रती केलेल्या योगदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय देउन उपकृत करावे. सर्वच नेत्यानी आपल्या ज्येष्ठ आई-वडिल व आजोबा-आजीचा त्याग आठवावा आणि किमान आतातरी न्याय द्यावा व त्यांना आभासी पंचतांराकित वृद्धाश्रमात पाठविण्याची किंवा त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची,अन्न-पानी त्याग अंदोलन,धरने अंदोलनतथा भिक मागण्याची वेळ आणूनये असी मागनी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्काॅम)वजिराबाद नांदेड अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य यांनी केली आहे.