लोहा| हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोह्यातील शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भाषण स्पर्धा घेण्यात आली .
राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले .सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांची भाषणे झाली.त्यांना बक्षीस देण्यात आले.मुख्याध्यापक श्री वडजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एच जी पवार यांनी आपले विचार मांडले. बहारदार संचलन बी एन गवाले यांनी केले.यावेळी डी एम कहालेकर, एस एच शेख, एस ई पवार, हरिहर धुतमल, आर आर पारेकर, एस आर शेटे, विठ्ठल वडजे, व्यंकट पवार, सौ सनपूरकर, सौ मीनाताई कळकेकर, श्रीमती खरात यासह कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिज्ञासा अभ्यासिकेत शिवजयंती साजरी
जिज्ञासा अभ्यासिकेत युवा नेते सचिन मुकदम, दीपक पाटील कानवटे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांनी जयंती साजरी करण्यात आली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अभ्यासिकेचे संचालक प्रवीण धुतमल, व्यवस्थापक बालाजी धनसडे व विद्यार्थी उपस्थित होते.