मारेकऱ्याना तात्काळ फाशी देण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी...
मुखेड, रणजित जामखेडकर। कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे हिंदुत्ववादी हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध व्यक्त करत मुखेड तालुक्यातील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजपाच्या वतीने तिव्र निषेध केला व तात्काळ फाशी देण्याची मागणी तहसिलदार काशिनाथ पाटील व पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांना दि. २४ फेब्राुवारी २०२२ रोजी निवेदन देऊन करण्यात आली.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया , कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरू केलेले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे .सिमीचेच दुसरे रूप असलेल्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया , कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमाफक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांच्या पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे . कायदा कायदयाचे काम करेलच परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करुन सुधरावे ही अपेक्षा सुध्दा या निवेदनातून व्यक्त केली.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया , कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाया संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा व हर्ष यांच्या मारेकयास तात्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गंगाधर पाटील,महेश मुक्कावार, संजय वाघमारे, किशोरसिंह चौहाण,शंकर नाईनवाड, दशरथ रोडगे, ज्ञानेश्वर डोईजड, गिरीष देशपांडे, सुरेश उत्तरवार, साईनाथ बोईनवाड, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले,राजु अनपलवार,नंदकुमार काचावार, राम संगेवार, व्हि.टी. गायकवाड, गणेश सुकेवार, रामेश्वर पांचाळ,सुरज डोईजड, बालाजी मेहरकर, शिवाजी दारेवाड, गजानन लंगेवाड,विनोद पाटील,लक्ष्मण पंडीत, गणेश नागरवाड, गजानन गुडमेवाड, सचिन गोत्राळ, अमोल पोतलवाड, नितिन रत्नपारखी, भगवान सुंकेवार, आकाश पोतदार, केतन मामडे,कृष्णा पायटकर, गोविंद म्हेत्रे, गोपाळ घाळेवाड, योगेश मरकंठवाड,संदिप गडमवाड, योगेश पाळेकर, राजेश भागवतकर, निखिल येरेवाड, नागनाथ आचेवाड, ज्ञानदिप वाकोडे, महेश पेंढारकर,नरेश रेनगुंठवार, मनोज बंडावाड, पवन अनंतवार, विशाल रोडगे, अनिकेत भुरे,बालाजी नुकुलवाड, ऋतिक गजलवाड,योगेश गौरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर यांच्यासह अनेक हिंदु बांधव उपस्थित होते.