बोधडीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट -NNL

न्याय मिळेपर्यंत बिल अदा करू नये -सत्यभामाबाई मुंडे

किनवट, माधव सूर्यवंशी। मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचे बोधडी बुद्रुक येथील काम अत्यंत निकृष्ट व बोगस साहित्य वापरून करण्यात आले आहे त्यामुळे भविष्यात केंव्हाही दुर्घटना होऊन मानव जीवित आणि होऊ शकते आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा बट्ट्याबोळ, पैशाचा अपव्यय होऊन आर्थिक नुकसान होईल, त्यासाठी संबंधित कंत्राटदारांना सदर कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी पंचायत समिती सदस्या श्रीमती सत्यभामाबाई मुंडे यांनी गटविकास अधिकारी किनवट यांना लेखी निवेदनाद्वारे केल्यामुळे संबंधित वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किनवट तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या बोधडी बुद्रुक वासियांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा या उदात्त हेतूने शासनाने सदर पाणीपुरवठा योजनेच्या कामास अंदाजे दोन कोटी रुपये मंजूर केले व प्रत्यक्षात कामही झाले, पण सदर कामात निकृष्ट व कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. सदर गुत्तेदाराकडून खोदण्यात आलेल्या विहिरी कमकुवत झाल्या आहेत.

 त्या केंव्हाही कोसळू शकतात आणि पाण्याच्या टाकीचे कामही अत्यंत निकृष्ट साहित्य वापरून करण्यात आले आहे.हा सर्व प्रकार बोगस कामातून भरमसाठ पैसा कमावण्यासाठी केला आहे. असाही आरोप लेखी निवेदनात  करण्यात आला आहे. परिणामी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भविष्यात कोणताच उपयोग होणार नाही आणि उलट मोठी दुर्घटना होईल याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यासाठी जोपर्यंत कामाचे मजबुतीकरण आणि गुणनियंत्रण पथकामार्फत तपासणी होणार नाही तोपर्यंत सदर झालेल्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाचे प्रशासनाने कोणतेच बिल अदा करू नये,त्यासाठी वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर बाबतीत जातीने लक्ष घालून तिडा सोडवावा आणि कोणतेच देयक अदा करू नये, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लेखी निवेदनात मार्फत देण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी