मुखेड, रणजित जामखेडकर। तालुक्यातील आंबुलगा बु ) येथील शिवलिंग महादेव मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सदगुरू खंडेराव भागवत महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने दि १ मार्च २०२२ वार मंगळवार रोजी महाशिवरात्री उत्सव निमित्ताने प्रसिद्ध किर्तनकार हरी भक्त पारायण सौ. आशाताई राऊत लातुरकर यांचे किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ठिक सहा ते आठ महापुजा व अभिषेक , आठ ते दोन शिवलिला अमृत पारायण व सायंकाळी साडे सहा वाजता दिप उत्सव आणि रात्री ठिक नऊ ते अकरा प्रसिद्ध किर्तनकार हरी भक्त पारायण सौ. आशाताई राऊत लातुरकर यांचे किर्तन आणि रात्री बारा ते चार हरी जागर चा कार्यक्रम राहील.दि २ मार्च २०२२ रोज बुधवार या दिवशी महेश व्यंकटराव उल्लिगड्डे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम राहील तरी गावातील व परिसरातील नागरिकांनी व वारकरी , टाळकरी , किर्तनकार , भजनी मंडळी व आजू बाजूच्या गावातील भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा व किर्तनाचा लाभ घ्यावे.असे आव्हान आंबुलगा येथील ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले.