मार्कंड येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन-NNL


नविन नांदेड।
नांदेड तालुक्यातील मार्कंड येथे २३ ते २ मार्च पर्यंत दुपारी १ ते ४ दरम्यान ह.भ.प. दिनानाथ महाराज इंजनगावकर यांच्या सुमधुर वाणीतुन भागवत कथा गोदावरी काट मार्कंडेशवर मंदीर मार्कंड येथे आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या सात वर्षांपासून सुरू करण्यात आलेली भागवत कथा याही श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सप्ताह मध्ये सकाळी ७ ते १० गोदावरी पुजन व आरती दुपारी १ ते ४ भागवत कथा , सायंकाळी ४ ते ६ महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

गायणाचारय ह.भ.प.सुधिर महाराज पळशिकर,सिधदवांदक राहुल महाराज खोडके मावळगावकर, तबलावादक वैभव ज्ञानेशवर येवले, पडवादक केशव वानखेडे बेटसांगविकर, व भजनी मंडळ मार्कंड, पिंपळगाव, कल्हाळ,खरबी,बामणी,डेरला ,भनगी, विष्णुपुरी, यांच्या समावेश असुन या सप्ताहात अन्नदाते अशोक जवादवार नांदेड, भानुदास बोकारे,माजी नगरसेवक प्रा.ललीता मुकुंदराव शिंदे, गोविंदराव धुमाळ ,रंगनाथ लामदाडे,राजु येवले, गोपीनाथ लोंढे ,पंढरी येवले हे असुन या भागवत कथा सोहळ्याचे संयोजक माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे हे आहेत. 

२ मार्च रोजी बुधवार सकाळी १० ते १२ ह.भ.प.भगवान महाराज इसादकर यांच्ये काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होईल. या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भाविक भक्तांनी ऊपसिथीत राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी मार्कंड यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी