सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवमती सिमा पाटील यांच्या शाहीर जलसाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे,नगरसेविका,सौ.बेबीताई गुपीले, माजी नगरसेविका प्रा.सौ.ललीता शिंदे,जयवंती गायकवाड, डॉ.सौ.करूणा जमदाडे, माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी ऊदयभाऊ देशमुख,भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, नांदेड महानगर दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, डॉ.नरेश गायकवाड, देविदास बसवदे,जयवंत काळे,लोकसभा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष संकेत पाटील, व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे ,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,पत्रकार उपस्थित होते.
यावेळी प्रणिता ताई देवरे यांनी जिजाऊ सृष्टी येथे महिलांसाठी व मुलींसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गढ किल्ले या बाबत मार्गदर्शन केले .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण व आ.मोहनराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने विविध निधी अंतर्गत जिजाऊ सृष्टी येथील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात साहेबराव गाढे यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार निधी अंतर्गत अभ्यासिका व व्यासपीठ साठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली तर सुत्रसंचलन विश्वास हंबर्डे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप कदम, स्वागताध्यक्ष संग्राम पाटील मोरे,सचिव बापुसाहेब पाटील, सह सचिव वंसत कदम, कार्याध्यक्ष राजु लांडगे यांच्यासह उपाध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे,अमोल जाधव,दिपक भरकड, सरस्वती धोपटे, ज्योती ताई पाटील, रत्नमाला जाधव.
शंकुतला पांडे,कमल हिवराळे, मणकरणा ताटे,वंदना मस्के, रूक्मिणी सुर्यवंशी, संगिता मोरे,ज्योती कदम,सिंधु शिंदे,संगिता कदम, अनुसया कदम,सविता गाढे, कौशल्या कदम व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष त्रयंबक कदम,संभाजी ब्रिगेडचे गजानन शिंदे,सोपान पांडे, साहेबराव गाढे,जयंवत काळे,भगवान ताटे, गजानन जाधव,ऊतम जाधव, यांच्या सह प्रसिध्दी प्रमुख,संघटक , सुत्रसंचलन समिती मिरवणूक समिती,व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सिडको यांनी परिश्रम घेतले. यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील
व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांनी शाहीर सिमा पाटील यांच्या सत्कार केला.यावेळी शाहीर सिमा पाटील यांनी पोवाडा, गोंधळ यासह अनेक गितातुन प्रबोधन केले ,या शाहीरी जलसा कार्यक्रमास नविन नांदेड परिसरासह ग्रामीण भागातील नागरीकांच्यी व महिलांची गर्दी होती.