नवीन नांदेड। नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना. अशोकराव चव्हाण मार्गदर्शनाखाली दि.१८ फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृह येथे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान व नवनिर्वाचित नगर परिषद पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या महीला व बालकल्याण माजी उपसभापती तथा सिडको वाघाळा शहर ब्लॉक महीला काँग्रेस अध्यक्षा प्रा. डॉ.ललिता शिंदे बोकारे यांचा सिडको येथून आतापर्यंत सर्वाधिक डिजीटल सदस्य नोंदणी केल्या बदल मा.ना.अशोकराव चव्हान यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा यथोचित सन्मान व गौरव करण्यात आला .
यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटिल, माजी खा. सुभाष वानखेडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर ,माजी मंत्री डि.पी.सावंत , मा.आ.माधवराव पाटिल जवळगावकर,नांदेड दक्षिण चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे,आ.जितेश अंतापुरकर, नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभेचे माजी आ. वसंतराव चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, विजय येवणकर, अभिजित सपकाळ ,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगे कर, महापौर जयश्री ताई पावडे,विजय पाटील चव्हाण, रविंद्र पाटील चव्हाण ,शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिंलवंडे,प्रल्हादराव पाटील ढगे,व अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.