लोहा| हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती हरसद (ता लोहा) येथे साजरी करण्यात आली.
हरसद येथे झालेल्या शिवजयंती व माता रमाई जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे होते. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, उपसभापती नरेंद्र गायकवाड, नगरसेवक बबनराव निर्मले, शुभम सोनाळे हरसद चे उपसरपंच संजय भालेराव यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश सोनाळे, शिवा नरंगले, नरेंद्र गायकवाड, बबन निर्मले यांची भाषणे झाली.
अध्यक्ष रतन भालेराव उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव सचिव धनराज भालेराव कोषाध्यक्ष सतीश भालेराव सहसचिव संतोष भालेराव मुन्ना भालेराव शिवा भालेराव दिलीप भालेराव मुख्य सल्लागार साहेबराव गायकवाड रामकिसन नामपल्ल सदस्य राष्ट्रपाल भालेराव रजनीकांत भालेराव ऋषिकेश गायकवाड अरविंद भालेराव रविकांत भालेराव यासह हरसद येथील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते संचलन निलेश पवार यांनी केले.