कुंडकर पिंपरी येथे रंगल्या कुस्त्यांच्या दंगलीचे आ.संतोष बांगर यांच्या हस्ते सुरुवात
हिंगोली| तरुणांनी व्यसनाधीनते पासून दूर राहिले पाहिजे आणि कुस्ती सारख्या खेळाकडे वळले पाहिजे. कुस्ती खा खेळ महाराष्ट्राची शान आहे, त्यामुळे मराठी खेळ कुस्त्यांची परंपरा कायम आहे. हि परंपरा चिरकाळ टिकण्यासाठी कुंडकर पिंपरी येथे कुस्तीचा आखाडा उभारण्यात येईल. त्यासाठी लागेल ती मदत देन्यास मी प्रयत्नशील असल्याचे उदगार आमदार संतोष बांगर यांनी काढले.
ते मौजे कुंडकर पिंपरी येथे कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांचा फड चांगलाच रंगला. यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की, तरुणांनी आपली शरीयष्टी जपण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करणे कुस्त्यांच्या एखादा गाजविण्यासाठी दररोज सर्व करणे गरजेचे आहे. येथे कुस्त्यांच्या सरावासाठी मैदान असले तरी कुस्तीचा एखादा अत्यंत गरजेचं आहे. आगामी काळात कुस्ती सारख्या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच कुस्तीचा आखाडा उभारू असेही आमदार बांगर यांनी सांगितले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ.रमेश शिंदे,माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, भानुदासराव जाधव,आनंदराव जगताप,प.स.सदस्य सुरेशराव कुंडकर,नगराध्यक्ष कपिल खंदारे,राजू नागरे,पंढरी मगर, राजू कऱ्हाळे, लखन शिंदे,केशवराव कान्हे,सुनील खंडागळे,श्रीराम कान्हे, माधवराव कान्हे,मसाराव कुंडकर, शेषराव कान्हे,रामराव कुंडकर,घनाजी कान्हे,विष्णू कान्हे, नितीन कर्हाळे,बापूराव कुंडकर,मुंजा बुआ पुरी, विजय कुमार कान्हे,कैलास कुंडकर,नितीन होकर्णे, गोपाळ बांगर,इंजि.संदीप बांगर,आशिष मुदिराज व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.