आ.संतोष बांगर साहेब यांच्या फंडातून श्री गोपाळ कृष्ण मंदिरासाठी 10 लक्ष रुपये निधी
हिंगोली| श्री गोपाळ कृष्ण मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ करण्याचा योग्य मला आला हे मी माझे भाग्य समजतो. सर्व हिंदू देवी - देवतांच्या आशीर्वाद, वडील धाऱ्या मायबाप जनतेच्या प्रेमामुळे मी आज विधानसभेत आहे. या पदाचा वापर धार्मिक क्षेत्रासह मायबाप जनतेच्या सेवेसाठी इमाने - इतबारे करतो आहे. हिंगोली जिल्ह्यातील मंदिरासह परिसराचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे. मंदिराच्या बांधकामासाठी आणखी निधी लागला तरी चाललं निधीची कमतरता कशीच भासू देणार नाही. असा विश्वास आ.संतोष बांगर यांनी येहळेगाव गवळी येथील जनतेला दिला.
आज शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते मौजे येहळेगाव गवळी येथे श्री गोपाळ कृष्ण मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. सदर मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी आमदार बांगर यांनी दिलेला आहे. त्या निधीतून मंदिराचे बांधकाम होणार आहे. यासाठी अजूनही काही लागल्यास मी देण्यास सदैव तयार आहे. यावेळी एवढेच सांगतो कि सर्व नवतरुण पिढीने पूर्वजांचे कार्य लक्षात घेऊन आपल्या आई वडिलांची, बहिणीची मनोभावे सेवा करावी म्हणजे देव आपोआप प्रसन्न होईल असा संदेश आ.संतोष बांगर यांनी उपस्थितांना दिला
युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जि.प.सदस्य बाळासाहेब मगर,प.स.सदस्य संजय मंदाडे, बाळासाहेब पतंगे, बालाजीराव देवकर, सोमनाथ रनखांब,सरपंच संजय गोविंदराव मंदाडे,सरपंच मारोतराव पतंगे,धोंडबाराव पतंगे, गणेशराव जाधव,तुकारामजी पतंगे,प्रताप मंदाडे,विश्वनाथ मंदाडे, तुकाराम मंदाडे,शंकरराव मंदाडे, चेअरमन राजेश मंदाडे,साहेबराव मंदाडे,सचिन मंदाडे, राजू नागरे,पंढरी मगर, अशोक पुरी,पंजाब मंदाडे, जनार्दन मंदाडे,नितीन होकर्णे,कांता पाटील,अनिल टवले व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.