शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन -NNL

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती प्रदर्शन, अन्नदान, पाणी वाटप


नांदेड|
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्याकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती प्रदर्शन, अन्नदान, पाणी वाटप कार्यक्रम राबवून शिवरायांना अभिवादन केले.

नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळ दि.19 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्टवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेक जणांनी रक्तदान केले. तसेच व्यसनमुक्ती अभियान व पोस्टर प्रदर्शन महेश्‍वरी गायकवाड यांनी आयोजित केले होते. व्यसनापासून दूर राहणे किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्यांना अन्नदान करण्यात आले तसेच पाण्याचेही वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी कल्पना डोंगळीकर, महिला शहराध्यक्षा सिंधूताई देशमुख, दत्ता पाटील तळणीकर ,शहर सरचिटणीस गणेश तादलापुरकर, प्रकाश मोराळकर, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारे, प्रेमजितकौर कोल्हापुरे, प्रशांत असमाणे, राहूल जाधव, गंगाधर कवाळे पाटील, गोविंद यादव, हरविंदरसिंघ, जोगिंदरसिंघ शाहू, बच्चू यादव, भिमराव क्षिरसागर, प्रकाश घोगरे, योगेश भकड, संतोष कोकाटे ,गजानन कल्याणकर, नंदाताई किरवळेकर, माहेश्‍वरी गायकवाड, चंद्रकांत टेकाळे, सुमन जाधव, वंदना कोकाटे, ज्ञानेश्‍वर चिद्रावार, हसिना बेगम, पांडूरंग क्षिरसागर आदी जणांची उपस्थिती होती.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी