नांदेड| सामाजिक कार्यकर्ते पवन गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ क्षितीज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने शहरातील रामनगर येथील सूमन बालगृहातील मुलींना स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते पवन गिरी यांचे काही महिन्यापूर्वी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. दि. 19 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या पश्चात क्षितिज जाधव व मित्र परीवाराने सुमन बालगृहात त्यांचा जन्मदिवस साजरा करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी सुमन अनाथ बालगृहातील सर्व मुलींना अंघोळीचे साबन, कपडे धुण्याचे साबन व पावडर, टुथपेस्ट, केसाचे तेल, शाम्पू, आदि दररोजच्या वापरातील स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सुमन बालगृहाच्या प्रिती दिनकर, पत्रकार सुरेश काशीदे, दिपंकर बावसकर, वैभव बनसोडे, पप्पू सरोदे, पत्रकार प्रदिप घुगे, यशपाल भोसले, कुंवरचंद मंडले, योगेश गुळवे, पप्पू कोल्हे, अॅड. जयपाल ढवळे, विजय जाधव,संघकिरण कदम आदिंची उपस्थिती होती.