नांदेड| भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. बाबू जगजीवनराम यांनी दि. १७ मार्च १९३५ रोजी स्थापन केलेल्या केंद्र शासन मान्य दलित कार्यकर्त्यांची एकमात्र संघटना भारतीय दलित वर्ग संघाच्या सन २०२२ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खासदार भास्करराव पाटील खतगांवकर व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ. मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
दिनदर्शिकेच्या माध्यमातून श्री संत रोहिदास महाराज तिर्थक्षेत्र बळीरामपूर, नांदेडची ओळख करुन देत असताना सदरील तिर्थक्षेत्राच्या स्थापनेपासूनचा उलगडा करण्यात आला आहे. गुरु महाराजांच्या मंदिराचे संकल्पित चित्र, बाबू जगजीवनराम यांचे स्मारक व तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त, सरपंच, उपसरपंच यांनी घेतलेली भेट यासह आदी घटनांना उजाळा देण्यासह भारतीय दलित वर्ग संघटनेस जिवंत ठेवण्याचेही काम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वामनराव विष्णुपूरीकर यांनी केल्याचे दिसून येते.
दिनदर्शिकेच्या अनावरणप्रसंगी वामनराव विष्णुपूरीकर, चंद्रकांत घोडजकर, गुंडप्पा बारोळे, वाय.बी. इनामदार, संतोष लष्करे, प्रकाश खंदारे, खंडेराव कांबळे, किशोर घोरवाडे, बालाजी जाधव, प्रकाश दिपके, प्रतिक कल्याणकर, वैभव शेळके, रवि कावलगावे, बालाजी मुराळकर आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.