नांदेड,आनंदा बोकारे | दरवर्षीप्रमाणे यंदाही कै.पदमीनबाई देशमुख सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा ना.अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्यावतीने यशवंत महाविद्यालय कॅन्टीन परिसर नांदेड येथे विविध प्रकारच्या, विविध जातीच्या शेकडो वृक्षांचे वृक्षारोप बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दि.26 व 27 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न होणार आहे.
देशाचे माजी गृहमंत्री, मराठवाड्याचे भाग्यविधाते कै.शंकरराव चव्हाण व कै.कुसूमताई चव्हाण यांची जयंती पुर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात येते. मागील पाच वर्षापासून शारदा भवन शिक्षण संस्थेअंतर्गत यशवंत महाविद्यालय, आयटीएम कॉलेज, अर्धापूर कॉलेज येथे शेकडो प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपन करून परिसर स्वच्छ व हरीत करण्याचा उपक्रम सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी राबविला आहे. यंदाही दि.26 व 27 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच ठिकाणी विविध पर्यटनस्थळ येथून आणलेल्या निवडक शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण ना.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास विशेष उपस्थितीत माजी आ.अमिताभाभी चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमरभाऊ राजूरकर, प्रमुख पाहुणे माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबूलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, शा.भ.शि.संस्थेचे सहसचिव अॅड.निंबाळकर, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.रावसाहेब शेंदारकर यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमास सर्व जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक, राहुल गांधी विचार मंचचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र एनजीओ संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष, कै.पदमीनबाई देशमुख सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी केले आहे.