‘महाकवी वामनदादा कर्डक विद्यापीठ’ गौरवग्रंथासाठी माहिती पाठवा -NNL


नांदेड|
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘महाकवी वामनदादा कर्डक विद्यापीठ गौरवग्रंथ’ १४ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित होणार असून या गौरवग्रंथांसाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावरील साहित्य पाठविण्याचे आवाहन या ग्रंथाचे संपादक प्रा. अशोककुमार दवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या आयुष्यामध्ये निःस्वार्थपणे समाजसेवेचे व्रत अंगीकारुन समाजाच्या हितासाठी आयुष्य घालविले. अशा या थोर महाकवीच्या जीवनातील घटना, घडामोडींचा लेखाजोखा जनतेसमोर यावा म्हणून प्रा. अशोककुमार दवणे यांनी हा संकल्प केला आहे. सदर ग्रंथ हा महाराष्ट्र राज्याची शान वाढणारच आहे. कारण हा ऐतिहासिक दस्तावेज भारताच्या आणि जगाच्या इतिहासात जमा व्हावा हा यामागचा प्रा. अशोककुमार दवणे यांचा मुख्य हेतू आहे.

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सहवासात राहिलेले, त्यांना जवळून पाहिलेले हजारो निष्ठावान लेखक त्यांच्यावर लिहिण्यास तयार आहेत. अशा १०० लेखकांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जीवनकार्यावर  लिहिलेली माहिती (गीतांची समिक्षा किंवा निव्वळ गीतच पाठवू नये. माहितीमध्ये चार-पाच गीतांंच्या ओळी घेऊ शकता.) कमीतकमी टाईप केलेले (एA-४ साईजमध्ये) ५ पेज आणि जास्तीत जास्त ८ पेज रीहेज्ञर्ज्ञीारीवरुरपशऽसारळश्र.लेा या इमेल आयडीवर किवा ९८९०३८१९५८ या व्हॉॅटस्‌अप नंबरवर १५ मार्च २०२२ पर्यंत पीडीएफ फाईलमध्ये पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी