हदगाव, शे चांदपाशा| भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली व शिक्षक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक परिषदेमध्ये शिक्षकांचा गौरव झाल्यानंतर गोविंद नांदेडे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणले कि, शिक्षकच राष्ट्राच्या शिल्पकार आहे तसेच शिक्षकांनी अभ्यास करून शिक्षित सुजान पिढी निर्माण करण्याचे काम करावे. ता हदगाव येथील तहसीलदार तथा तालुक्याचे दडाधिकारी जिवराज डापकर यांना नोबेल ऑफिसर पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
हदगाव येथे भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली व विद्रोही शिक्षक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक सन्मान परिषद व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हदगाव चे तहसीलदार जीवराज डापकर यांना (नोबेल ऑफिसर पुरस्कार) तर संजय डमरे यांना राज्यस्तरीय शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोविंद नांदेडे (माजी शिक्षण संचालक पुणे )तर उद्घाघाटक म्हणून हदगाव विधानसभाक्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकर होते. प्रमुख पाहुणे ब्रिजेश पाटील (उपविभागीय अधिकारी हदगाव) पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, न.पा.चे मुख्याधिकारी जाधव, नायब तहसिलदार येरावाड, उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले, पंजाबराव पाटील हरडफकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये अनेकांना दिल्लीचे फेलोशिप आवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. संजय डमरे मुख्याध्यापक हायस्कूल हदगाव, विमल धुळे मुख्याध्यापिका मुलीचे हायस्कूल, प्रेमिला सेनकुडे, त्रिभुवन चव्हाण, वसंत मेटकर विस्ताराधिकारी, के एन कांबळे सहशिक्षक, बि. एन. सूर्यवंशी सहशिक्षक ,पांडुरंग सूर्यवंशी उद्यान अधिकारी विद्यापीठ नांदेड, बँकेचे प्रबंधक प्रदीप मानवतकर तर स्वतः गुणवंत काळे यांना गौतम बुद्ध गौतम बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप आवार्ड दिल्ली भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात आला. यशस्वी करण्यासाठी गुणवंत काळे,देविदास टाले, प्रविन नरवाडे ,नामदेव कराड ,बी.एन. सूर्यवंशी ,यल्लाप्पा देवकर ,बाबासाहेब काळे ,सुरेश कदम,भागवत केंद्रे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्रोही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गुणवंत काळे यांनी केले
हदगाव तालुक्याचे तहसिलदार व दडाधिकारी जिवराज डापकर यांनी कोरोनाच्या काळात फारच महत्त्वपुर्ण भुमिका बाजावली त्यांच्याकडे त्याकाळी हदगाव व्यतरिक्त हिमायनगर तालुक्याच पण पदभार होता. त्यांनी उपविभागीय पदभार संभाळतांना कोरोनाच्या काळात सर्वत्र लाँकडाऊन असतांना मुंबई व्यतिरिक्त अन्य शहरातील कुंटुब आपल्या नातेवाईक यांना भेटण्यासाठी हदगाव आले असता ते लाँकडाऊन मुळे शहरात होते. ते अश्या अनेक कुंटुबाना त्यांना विशेष पास देवुन त्याच्या घरी पाठविले तसेच कोरोनाच्या काळात शासनाकडुन मदत व्यतिरिक्त सामाजिक संस्थाना अहवान करुन अनेकांची जेवणांचीही सोय त्यांनी केली होती हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.