मद्यपान करुन शिवजयंती साजरी करू नका छत्रपती
लोहा। मद्यपान करून शिवजयंती साजरी करु नका छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतःकरणात रूजवा असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प सोपान महाराज आहेरवाडी कर यांनी आडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात केले.
लोहा तालुक्यातील आडगाव येथे शिवजन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी ह.भ.प सोपान महाराज आहेरवाडीकर आपल्या किर्तनात म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले.
गोरगरीबांना , शेतकऱ्यांना न्याय दिला. माता भगिनी चे रक्षण केले असा लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशात होऊन गेले त्यांचे विचार प्रत्यकांने अंगिकारले पाहिजे असेही भागवताचार्य ह.भ.प.सोपान महाराज म्हणाले.