नांदेडमधे शिवजयंती जल्लोषात साजरी; काही निवडक क्षणचित्रे -NNL

 

 नांदेडमधे शिवजयंती निमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर

 नांदेडमधे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंचावरून शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकताना माधव पाटील देवसरकर. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रम मंचावरून शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकताना प्रणिताताई देवरे-चिखलीकर. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीर उद्घाटन प्रसंगीचे छायाचित्र . छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात अनेक युवा दात्यांनी रक्तदानाचे श्रेष्ठ कार्य केले त्या प्रसंगीचे छायाचित्र . छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिवजन्मोत्सव साजरा करताना महिला मंडळी. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेडच्या शोभायात्रेत चिमुकल्या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेड येथील प्रजासत्ताक पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेडच्या शोभायात्रेत युवकांनी भगवा ध्वज हाती घेऊन कवायती सादर करून सर्वांचे लक्ष वेधले होते.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेडच्या शोभायात्रेत महिलांनी फुगडी धरून सर्वांचे लक्ष वेधले होते.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मुदखेड येथील युवकांनी नांदेडमध्ये मशाल घेऊन आल्यांनतर त्यांनी येथील शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर  

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महिला- पुरुष मंडळींच्या उपस्थित ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली होती.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने  शोभायात्रा काढण्यात आली, यात छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊंची भूमिका साकारून घोड्यावर स्वर झाल्याचे सजीव देखावा पाहावयास मिळाला होता.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. यात महिला मंडळींनी फेटा परिधान करून उपस्थित झाल्या होत्या. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नांदेडच्या शोभायात्रेत महिलांनी फुगडी धरून सर्वांचे लक्ष वेधले होते.  छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी शिवरायांना अभिवादन केले. छाया - ज्ञानेश्वर सुनेगावकर

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी