नांदेड| बिलासपुर विभागात नॉन-इंटरलॉक वर्किंग कार्य सुरु करण्यात आल्यामुळे नांदेड- संत्रागच्ची-नांदेड एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ने कळविले आहे. ते पुढील प्रमाणे -
1) नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 हजूर साहिब नांदेड - संत्रागच्ची साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) संत्रागच्ची येथून सुटणारी गाडी संख्या 12768 संत्रागच्ची - हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 23 फेब्रुवारी, 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.