नांदेड| नांदेड मधील कॅरम खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि राज्य स्तरावरील खेळाडू सोबत खेळून अनुभव संपन्न करण्यासाठी ममता नगर देगलूर नाका येथील गुडलक कॅरम स्पोर्ट तर्फे खुल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मुंबईच्या जावेद अहमद यांनी पटकावले त्यांना रोख 25 हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक राजे गोईल मुंबई यांना रोख 15 हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक नांदेड येथील वाजिद जबरी यांना रोख आठ हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
हैदराबाद तेलंगणा येथील अहमद कुरेशी यांना चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 5000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र उप महापौर अब्दुल गफ्फार, मजी उप महापौर शमीम अब्दुल्ला,रउफ ज़मीनदार (राष्ट्रवादी युवा कांग्रेस ज़िल्हा अध्यक्ष),चाँद भाई,यांचा हस्ते देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन शेट्टी ब्रदर्स यांच्यावतीने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी बाहेर गावावरुन आलेल्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्षद जागीरदार, जावेद जाबरी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी गुडलक स्टील अँड हार्डवेअर यांनी प्रायोजक म्हणून भूमिका पार पाडली. भविष्यात देखील अशाच प्रकारे कॅरम स्पर्धा आयोजन करून नवीन खेळाडूंना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा मानस आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आला.