लोहा| केंद्रातील भाजपा सरकारविरुद्ध विरुद्ध आवाज उठविणाऱ्या मंत्र्यांवर आणि राजकीय पुढार्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखाली या अटकेचा निषेध करण्यात आला व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यानी तहसीलदार यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणेच्या इडीकडून अटक करण्यात आली. मंत्र्यांवर खोटे आरोप करत त्यांना अटक करण्याचे कपटी राजकारण केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे .याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी टीका केली. केंद्र सरकार व ईडी कार्यवाहीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय पाटील कराळे,किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर, माजी प स सदस्य, कार्याध्यक्ष प्रल्हाद पाटील फाजगे, सरपंच छत्रु महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील कराळे ,तालुका उपाध्यक्ष शिवराज पाटील पवार, चितळीकार, किसान सभाचे तालुकाध्यक्ष विलास पाटील चुडवकर, अजय हंकारे, तालुकाध्यक्ष स्वप्निल पांचाळ बालाजी पाटील मोरे, रायुका शहराध्यक्ष बंटी सावंत, मारुती कांबळे, अंगद पाटील गवते, तालुका उपध्यक्ष राम पाटील पवार, बंडू पाटील चव्हाण, पवन पाटील पवार, फुलाजी पाटील ताटे, गजानन पालीमकर, मारुती पवार, राजेश पवार, पांडुरंग पवार, दत्ता पवार, प्रथमेश पवार यासह कार्यकर्ते उपस्थित होते.