उस्माननगर, माणिक भिसे। जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा उस्माननगर येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात वर्गातील बावीस विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक म्हणून कुमारी ( रुपाली) उपाली सोनसळे, तर उपमुख्याध्यापक म्हणुन रतिका घोरबांड ह्या विद्यार्थिनीने काम पाहिले. व सेविका म्हणून बुशरा शेख या विद्यार्थिनींनी काम केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते. उपक्रमातील सर्व विद्यार्थिनींचे कौतुक करण्यासाठी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव काळम व सर्व सदस्य , तसेच ज्येष्ठ शिक्षक वारकड गुरुजी व सर्व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले.
तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय येरमे , यांनी शाळेस आचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले. उपक्रमाचे नियोजन पाहून शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. आजचा दिवस विद्यार्थिनीच्या जीवनात खूप खूप आनंद देऊन गेला. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावला आहे . सौ .वांगे. व्ही .बी. मुख्याध्यापक जि .प. कन्या शाळा यांनी विद्यार्थ्यांनी यांचे कौतुक केले.