शेळगांव (गौरी) ग्रामपंचायत ने केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी व ग्रामपंचायत कार्याची वर्षपुर्ती आढावा बैठक सपंन्न
नायगाव। तमाम हिंदू चे दैवत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करुन जय भवानी जय शिवाजी आसा जयघोष करण्यात आला व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य याना एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे गावातील नागरीकासमोर वर्षेभरातील कार्याचा आढावा बैठक आयोजित केली होती यावेळी सरपंच प्राचार्य डाँ,मनोहर तोटरे यानी वर्षेभरातील कामाचा आढावा गावकर्यासमोर ठेऊन मि गावातील मुलभूत गरजा सोडविण्यासाठी कट्टिबद्ध आसल्याचे प्रतिपादन केले.
निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपण काही आश्वासन देतो ते गावातील नागरिक लक्षात ठेवत आसतात आपण बोललेले आश्वासना पैकी किमान साठ-सत्तर टक्के काम आपल्या काळात झाले तर आपण नागरिकांच्या समोर पुन्हा जाऊ शकतो आसे उद्दगार उपसरपंच प्रतिनिधी राजेन्द्र पाटील शेळगांवकर यानी केले.या आधी अनेकदा आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात काम झाले नाही. त्यानंतर गावातील मतदारानी आम्हाला सत्तेवर आणले म्हणून आम्ही यासंबंधी अनेक आश्वासने न देता शक्य होईल व महत्वपुर्ण योजनेचाच शब्द दिला आसेही यावेळी म्हणाले.
यावेळी सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे यानी गावातील सर्व नागरिकांना या बैठकीत उपस्थित राहाण्याचे अव्हान केले होते यावेळी वर्षेभरात काय काम केले किवा काम काहीच झाले नाही. आशी शेळगांव नगरीत मोठी चर्चा सुरू झाली होती. कामासंबंधीच संभ्रम निर्माण करणारी माहिती कोण फिरवत होते माहिती नाही पण आम्ही वर्षेभरात उज्वला गँस योजना.पाणीपुरवठा.पंतप्रधान घरकुल आवास योजना. गावातील नाली,रस्ते.मनरेगा अतंर्गत विविध वैयक्तिक व सार्वजनिक योजना.वैयक्तिक शौचालय योजना.नानासाहेब देशमुख कृषी योजना.शुद्ध पिण्याचे पाणी.लाईट डेप्पो.लाईट खांब व बल्प इत्यादी योजनेच्या माध्यमातून गावातील होत आसलेल्या कार्याची माहिती विस्तृतपणे यावेळी देण्यात आली.
ग्रामपंचायत नवनिर्वाचित कार्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. नवीन सरपंच,उपसरपंच व सदस्य हे नवीनच काम करत आसल्यामुंळे गावातील नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते पण. या बैठकीत कामाचा लेखाजोखा नागरिकांच्या समोर भूमिका मांडली यामुळे या बैठकीची नागरिकांनी लक्ष वेधून घेतली.
या बैठकीला सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे.उपसरपंच प्रतिनिधी राजेन्द्र पाटील शेळगांवकर.ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार.प्रा.समदानी सय्यद.माजी चेअरमन सुनिल रामदासी.माजी सदस्य संतोष देशमुख.सुधाकर पाटील.दत्ताहारी शिंपाळे.शिवाजी शिंपाळे.नागनाथ टेकाळे.माजी चेअरमन रावसाहेब पाटील.निरजंन काठेवाडे.बबन काठेवाडे व गावातील जवळजवळ दोनशे नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.