हदगाव शहरातील प्रसिध्द उद्योगपती दमकोडवार बंधुना खंडणी मागणा-या खंडणीखोरांस पोलिसानी ठोकल्या बेड्या -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
हदगाव शहरातील प्रसिध्द उद्योगपती दमकोडवार बंधुना खंडणी मागणा-या खंडणीखोरांस स्थागुशाच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस खाक्या दाखविताच आरोपींची सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने. या आरोपीतांनी इतर कुठे कुठे आरोपीतांनी कारनामे केले याचा शोध घेऊन त्या सर्वाना दिलासा देण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

हदगाव शहरातील प्रसिध्द युवा उद्योगपती श्रिनिवास दमकोडवार यांना २५ लाख रुपये दे... नही तर आम्ही तुम्हाला खतम करु. अश्या धमक्या दमाकोडवार बंधु याच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्ती कडून आल्या होत्या. दमकोंडवार यांनी बाबतीत हदगांव पोलिस स्टेशनला खंडणी मागणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने हदगाव पोलिसांनी  गु.र क्र.३५/२०२२ कलम ३८४.५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हे गंभीर प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे देण्यात आले होते. 

त्यांनी पकडण्याचे आदेश पोलिस आधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलिस निरक्षक (स्था.गु.) विभागातील पोलिस निरक्षक, अधिकारी व अमलदार यांचे पथक आदेशित केले होते. जेव्हा फोन करुन खंडणी मागणा-याची खाञी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी खंडणी मागणा-या उस्मान शाह उर्फ दादु पिता फत्ताशाह वय २३ वर्ष, करिमोद्दीन आजिमोद्दीन काझी वय ७१ वर्ष, शे रहीम पिता आबुबकर सिद्धीकी वय २४ वर्ष हे तिघे ही हदगाव शहरातील मुल्लागली याना अटक केली आहे. ते हदगाव येथील रहवाशी असुन यानी दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी हदगाव येथील प्रसिध्द युवा व्यापारी श्रिनिवास दमकोडवार यांना २५ लाख रुपये दे नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना खतम करतो अशी धमकी दिली होती.

त्यावरुन स्थागुशाखेचे पथकाने त्यांना ताब्यात घेवुन पोलिस हिसका दाखवताच त्यांनी कबुली दिली. सदर आरोपी हदगाव पोलिस स्टेशनच्या गुन्हाच्या तपास कामी देण्यात आले आहे. ही यशस्वी कामगारी पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश मोरे, अप्पर पोलिस आधिक्षक विजय कबाडे भोकर, पोलिस निरक्षक (स्थागुशा) द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी  पाडुरंग भारती, पोलिस उपनिरक्षक अशिष बोराटे, पो. हे.काँ गंगाधर कदम, पो ना. संजीव जिकलवाड, पोकाँ.बालाजी तेलग, पो का.विठ्ठल शेळके, पो काँ.विलास कदम, महेश बिडगु., राजु सिटीकर, यादगिरवाड, रवि बाबर, चालक अर्जुन शिदे, याँनी पार पाडली. सूचनेचे पालन करून तातडीने खंडणीखोरांना ताक केल्याबद्दल सदर पथकाचे पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी