नांदेड। जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि शिवअभिवादन कार्यक्रम पार पडला. या अभिवादन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा सर तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप राठोड उपस्थित होते.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा सर व मा दिलीप राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पण प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा धगधगता ऐतिहासिक आढावा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिवप्रेमींसमोर, विद्यार्थ्यानं समोर मांडला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.दिलीप राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की 400 वर्षा पूर्वी शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा संदेश दिला.फक्त वाळलेलीच झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली होती.आणि तोच धागा पकडून जिल्हा परिषद हायस्कूल वाघी प्रशालेस आज छानशी विविध फुलांची रोपे आणून दिली व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.मुलांनी या झाडांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की शिवचरित्रातून आपण बोध घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा एखादा तरी गुण सर्वांनी आपल्या आचरणात आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या नंतर स्काऊट गाईड च्या विद्यार्थी यांनी कुंडी मध्ये विविध फुलांची रोपटे लावली व श्रमदान केले.उपस्थित सर्व विद्यार्थी ,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ घेतली आणि सर्वांना कापडी पिशवी चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी श्री शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा शिवलिंग राजाराम आवर्दे या विद्यार्थ्याने साकारली होती.त्याला पाहून इतर मुलांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी केले.
यावेळी संजय शेळगें, डॉ.दत्तात्रय जोशी, बालाजी क्षीरसागर,विठ्ठल पवार, सुदर्शन बिंगेवार, रामदास अलकटवार, विलास झोळगे, सौ जयश्री वडगावकर,सौ सुरेखा काळे,सौ.यमुना शिंदे कदम, शेळके रघुनाथ, प्रलोभ कुलकर्णी,माधव आदमाने हे शिक्षक वृंद या वेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर नामेवार,हेमंत वागरे,पुष्पा बिरादार स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.शिवजयंतीच्या या कार्यक्रमासाठी प्रशालेचे, स्काऊट गाईड चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.