नांदेड तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायत असलेल्या हेमला तांडा येथे संत सेवालाल सभागृहासाठी निधीची मागणी येथील ग्रामस्थांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या कडे केली होती.मागणीची दखल घेत आमदार मोहनराव हंबर्डे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला.
२५ फेब्रुवारी रोजी आ.मोहनराव हंबर्डे, संरपच पुंडलिक मस्के,कैलास राठोड, गोपीनाथ राठोड, प्रकाश आडे,सुदाम आडे,एकनाथ राठोड, राहुल आडे, अतुल आडे, रमेश आडे,प्रकाश पवार,दाजीबा राठोड,शंकर पवार, प्रल्हाद आडे,सिताराम राठोड, भानुदास राठोड,ऊतम आडे,भिमा राठोड,पुनाजी आडे, रंगराव आडे, नामदेव आडे यांच्या सह ग्रामस्थ यांच्यी उपस्थिती होती. ऊपसिथीत पाहुण्यांचे व मान्यवरांच्या सत्कार संयोजक विठ्ठल आडे यांनी केला.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्ञानेशवर चिंतोरे यांनी केले.
सिडको सराफा असोसिएशनच्या वतीने आ. हंबर्डे यांच्या सत्कार..
सिडको हडको परिसरातील सराफा नुतन नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवड करण्यात आल्या नंतर सिडको भागात एका कार्यक्रमात आ.मोहनराव हंबर्डे यांच्या सत्कार अध्यक्ष अतुल धानोरकर, उपाध्यक्ष प्रशांत टेहरे, सचिव रवींद्र कुलथे, कोषाध्यक्ष आबाजी पांचाळ,त्रुषिकेश दहिवाड,सचिव मयुर लोलगे, सल्लागार सतिश लोलगे,तममेवार, आढाव, दिपक धानोरकर,व सदस्य गुरूप्रसाद डहाळे,गोपाळ वाकडे श्रीपाद डहाळे,राजु माळवे, भालचंद्र दिक्षीत, प्रमोद शहाणे,गोपाळ बोकण,तानाजी डहाळे, संतोष पांचाळ, मुन्ना धानोरकर,राजु पांचाळ,गणपत डहाळे, गणेश टाक,कृष्णा पांचाळ, शिवाजी डहाळे,प्रंशात डहाळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. हंबर्डे यांनी सराफा असोसिएशन पदाधिकारी यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले,या वेळी प्रभागातील नगरसेविका प्रतिनिधी ऊदयभाऊ देशमुख व परिसरातील व्यापारी वर्ग ऊपसिथीत होते.