सिडको शिवसेनेच्या माजी उपशहर प्रमुख मैड यांच्यी मागणी
नविन नांदेड। सिडकोतील मूळ घरमालकाच्या अनुउपास्थित घराचे हस्तांतर करणेबाबत यापूर्वी देखील अनेक निवेदन देण्याल आले होते, पंरतु वरीष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत सोडविण्यात येतील असे सांगुन अद्यापही कोणतीच कारवाई न केल्याने शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख प्रमोद मैड यांनी तात्काळ या संदर्भात घरे हस्तांतरण करून द्या अन्यथा अमरण उपोषण चा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यानंतर सिडको प्रशासनाने सांगितले कि वरिष्ठआंच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न सोडविण्यात आले आहे व नांदेड जिल्याचे पालक मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण साहेब व तसेच दक्षिण नांदेडचे आमदार मोहन आपणा हबर्डे साहेब यांनी सिडकोच्या नागरिकांना वर्तमानप्रत्याच्या माध्यमातून कळविले होते कि ऐक ते दोन महिन्यात हे घरे मूळ घरमालकाच्या अनुउपास्थिती मधील घरांचा हस्तांतराचा प्रश्न त्वरित सुटेल असे सांगितले होते हे आयकून जे घर मालकीचे नाही पण त्याबद्दल आहे असे खूप व्यक्ती समाधानी होती. परंतु हा प्रश्न आज दिवसापर्यंत देखील प्रल्मभीत आहे तरी जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत कि काय असे नागरिकांना वाटते.
तरी सिडको मुख प्रशासक संभाजीनगर (औरंगाबाद) व मिडको प्रशासक साहेबांना विनंती करण्यात येते कि सिडकोतील मूळ घरमालकाच्या अनुउपास्थित घराचे हस्तांतरीत करण्याचा निर्णय कधी पासून आमलात येणार आहे त्याचे लेखी आश्वासन हे निवेदन आपणास प्राप्त झाल्यापासून १५ दिवसात देण्यात यावे अन्यथा सिडको प्रशासनाच्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल त्यानंतर जे काही घडेल त्याची पूर्णत्व जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील.
सिडको प्रशासकांनी हा थेट ईशारा समजून सिडकोच्या नागरिकांना लेखी स्वरुपात निर्णय दयावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माजी उपशहर प्रमुख प्रमोद मैड,माजी शहरप्रमुख निवृती जिंकलवाड, साहेबराव मामीलवाड, पप्पु गायकवाड, विष्णु कदम यांच्या सह पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेटून निवेदन दिले.