गोपाळचावडी येथिल श्री गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान तिर्थक्षेत्र येथे गेल्या ५१ वर्षापासुन दरवर्षी प्रमाणे या वर्षी ५२ व्या वर्षाही महाशिवरात्री निमित्ताने अखंड दत्तनाम सप्ताह पालखी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत, दि २४ फेब्रुवारी गुरुवार सकाळी पहाटे ५ वा श्री आनंदबन महाराज गुरु गंभीरबन महाराज यांच्या हस्ते महापुजा करून दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात झाली असुन हा सोहळा दि २ मार्च बुधवार अमावस्येच्या दिवशी दुपारी १ वा त्रिभुज बबूत्रा व श्री गूरू विठ्ठलनाथ महाराज यांच्या समाधीचा महा अभिषेक श्री समाधान महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, दि २ मार्च रोजी दुपारी २ वा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आ .मोहन हंबर्डे जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, जि. प .
सदस्य मनोहर शिंदे , माजी उप महापौर विनय पाटील गिरडे , भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील घोगरे , सरपंच श्रीमती गिरजाबाई डाकोरे, उपसरंपच साहेबराव सेलुकर, आदी मान्यवरांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न होणार असुन दुपारी तिनं वाजता भावीक भक्तांन साठी महाप्रसादाचे सूरुवात होईल , व रात्री ठीक ७ वा गुरू विठ्ठलनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा गावातील प्रमुख रस्त्याने निघेल व सांगता गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे होईल
रात्री ८ वाजता गावातील अनेक भजनी मंडळीच्या हस्ते भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचा सर्वभाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहान गोपाळचावडी ग्राम पंचायतीच्या सरपंच श्रीमती गिरजाबाई डाकोरे,उपसरपंच साहेबराव सेलुकर, आशीर्वाद डाकोरे याच्या सह गावकऱ्यांनी केला आहे.