हडको येथील गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिनानिमित्त महाप्रसाद-NNL

नविन नांदेड। हडको येथील गजानन महाराज मंदिर येथे २३ फेब्रुवारी गजानन महाराज यांच्या प्रगटन दिनानिमित्त महाअभिषेक, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २३ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराज यांच्या प्रगटन दिनानिमित्त हडको येथील गजानन महाराज मंदिर येथे सकाळी महाअभिषेक पुजारी सुमनबाई वामनराव शहाणे यांनी मंत्रोपचारांनी पुजा केली. यावेळी यजमान म्हणून सौ.सुनिता सुरेशराव घोगरे यांनी महाअभिषेक केला.

प्रगटन दिनानिमित्त भजन किर्तन आयोजन करण्यात आले होते, दुपारी महा आरती नंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन गजानन कते यांच्या कडून करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे विश्वस्त डॉ.अनिल सातारकर  ,निर्मला संगम पतेवार,सुनिता घोगरे, अंजली भाले, शंकुरवार, हिंगणे ,पांचाळ,टेहरे ,निलावार, यांच्या सह भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी