मालेगाव/नांदेड| गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षात काम करणारे जिल्ह्यात रसा तळाला गेलेल्या शेका पक्षाला जिवंत ठेवणारे जिल्हाध्यक्ष शुभाशिष कामेवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
पक्षाचे जिल्ह्यात असलेले आमदार व विभागीय चिटणीस मनमानी पद्धतीने काम करून पक्षात गट बाजी निर्माण करत असल्याचा आरोप आपल्या राजीनाम्यात कामेवार यांनी केला. जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व संपले असताना जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्ष जिवंत ठेवला पक्ष वाढीसाठी अनेकदा पक्षाला पत्र व्यवहार केला परंतू पक्षा कडून बळ मिळाले नाही.
उलट पक्षी पक्षाच्या वरिष्ठांकडून आमदार समर्थकांना मनमानी पद्धतीने पदांचे वाटप करण्यात आले. पक्षाचा आमदार जाहीर पणे राष्ट्रवादीचा असल्याचे बोलत असताना पक्ष त्यांचे समर्थन करत असल्याचे दिसत असल्यामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले.